Tuesday, March 11, 2008
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाहीआज इथे उद्या तिथे.........
कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाहीशब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,
Monday, March 10, 2008
Marathi Kavita
नमस्ते मित्रानो,
हे जे कही मी इथे ठेवतो आहे , ते मेज़ बनाव्लेले नाही. मी फक्त तुम्ही लोकंपर्यंत पोहोचावान्याचा प्रयत्न करतोय. जेनेकरुण मराठी बद्दल लोकंमधे प्रेम निर्माण व्हावे.
( विनंती :- जर कोणाला या पासून कही ओब्जेक्शन असल तर कृपया माला कलवा. मी ते काढून टाकेल)
( तशी माजी मराठी चांगली आहे , पण इंगलिश मधे मराठी लिहिने कठिन आहे , तर कृपया मला maफ करा

